Thursday 29 October 2015

स्तनपानामुळे फिगरला धोका नाही

http://www.lokmat.com/storypage.php?newsid=7424898&catid=10

  • मुंबई : करिअरमुळे वयाच्या तिशीत आल्यावर लग्न करणाऱ्या अनेक मुलींना मातृत्व तर हवे असते. पण, त्यानंतर बांधा सुडौल राहील की नाही याची अधिक चिंता असते. मुलाला जन्म दिल्यावर स्तनपान केल्यास फिगर बिघडेल अशी भीती तरुण मातांना असते. पण, स्तनपान करणे हे महिला आणि बाळाच्या आरोग्याच्या
    दृष्टीने चांगले असते. त्यामुळे महिलांचा बांधा सुडौल राहण्यास मदत होते, असे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.
    मुल जन्माला आल्यावर पहिल्या ४८ तासांत मातेला येणारे दुध हे बाळाच्या शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी उपयुक्त असते. दुधात असणाऱ्या चिकामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आईचे दुध हे बाळासाठी अमृत असते. पण, अनेक गैरसमजांमुळे बाळाला आईचे दुध मिळत नाही. ही बाब अत्यंत अयोग्य आहे. सर्वांनीच मातेच्या दुधाविषयी असलेले गैरसमज दुर होण्याची आवश्यकता आहे. स्तनपान केल्यास मातेच्या शरीरातील चरबी कमी होते. यामुळे बांधा सुडौल होण्यास मदत होते. ६ महिने स्तनपान केल्यास त्या महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, असे डॉ. कटके यांनी सांगितले.
    स्तनपान केल्याने बाळ भावनिकदृष्ट्या आईशी जोडले जाते. सहा महिने आईचे दुध पिणाऱ्या बाळाची बौद्धिक क्षमता चांगली होते. त्याचा शारिरीक विकास चांगला होतो. त्यामुळे स्तनपान गरजेचे आहे. ज्या महिला नोकरी करत असतील, त्यांना सहा महिन्यांची रजा मिळाली पाहिजे. सहा महिने रजा मिळत नसल्यास नोकरीच्या ठिकाणी तिला काही सुविधा पुरवल्या पाहिजेत. खासगी आणि स्वच्छ लॅक्टेशन रुम असल्या पाहिजेत. आईचे दूध हा बाळांचा हक्क आहे. तो त्यांना मिळण्यासाठी मातेला नातेवाईक, कुटुंबिय, सहकाऱ्यांनी मदत केली पाहिजे, असे मत बालरोग चिकित्सक डॉ. नीता नथानी यांनी मांडले.

No comments:

Post a Comment