Saturday, 31 October 2015

सहा महिन्यांच्या गर्भपातास परवानगी द्या : राष्‍ट्रीय महिला आयोगाची मागणी

  • संतोष आंधळे
  • Feb 04, 2013, 06:59 AM IST

Thursday, 29 October 2015

स्तनपानामुळे फिगरला धोका नाही

http://www.lokmat.com/storypage.php?newsid=7424898&catid=10

  • मुंबई : करिअरमुळे वयाच्या तिशीत आल्यावर लग्न करणाऱ्या अनेक मुलींना मातृत्व तर हवे असते. पण, त्यानंतर बांधा सुडौल राहील की नाही याची अधिक चिंता असते. मुलाला जन्म दिल्यावर स्तनपान केल्यास फिगर बिघडेल अशी भीती तरुण मातांना असते. पण, स्तनपान करणे हे महिला आणि बाळाच्या आरोग्याच्या
    दृष्टीने चांगले असते. त्यामुळे महिलांचा बांधा सुडौल राहण्यास मदत होते, असे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.
    मुल जन्माला आल्यावर पहिल्या ४८ तासांत मातेला येणारे दुध हे बाळाच्या शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी उपयुक्त असते. दुधात असणाऱ्या चिकामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आईचे दुध हे बाळासाठी अमृत असते. पण, अनेक गैरसमजांमुळे बाळाला आईचे दुध मिळत नाही. ही बाब अत्यंत अयोग्य आहे. सर्वांनीच मातेच्या दुधाविषयी असलेले गैरसमज दुर होण्याची आवश्यकता आहे. स्तनपान केल्यास मातेच्या शरीरातील चरबी कमी होते. यामुळे बांधा सुडौल होण्यास मदत होते. ६ महिने स्तनपान केल्यास त्या महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, असे डॉ. कटके यांनी सांगितले.
    स्तनपान केल्याने बाळ भावनिकदृष्ट्या आईशी जोडले जाते. सहा महिने आईचे दुध पिणाऱ्या बाळाची बौद्धिक क्षमता चांगली होते. त्याचा शारिरीक विकास चांगला होतो. त्यामुळे स्तनपान गरजेचे आहे. ज्या महिला नोकरी करत असतील, त्यांना सहा महिन्यांची रजा मिळाली पाहिजे. सहा महिने रजा मिळत नसल्यास नोकरीच्या ठिकाणी तिला काही सुविधा पुरवल्या पाहिजेत. खासगी आणि स्वच्छ लॅक्टेशन रुम असल्या पाहिजेत. आईचे दूध हा बाळांचा हक्क आहे. तो त्यांना मिळण्यासाठी मातेला नातेवाईक, कुटुंबिय, सहकाऱ्यांनी मदत केली पाहिजे, असे मत बालरोग चिकित्सक डॉ. नीता नथानी यांनी मांडले.

Monday, 26 October 2015

A rare presentation of heteropagus conjoined twin: a case report with review of literature

Authors: Rajshree Dayanand Katke*, Nidhi Sudhakar Kurkal, Tamanna Vinaik, Priyanka Pagare

Department of Obstetrics & Gynaecology, Cama and Albless Hospital, Grant Government Medical College and Sir J.J Group of Hospitals, Mumbai, Maharashtra, India.


पोटातून काढला तीन किलोचा गोळा

पोटातून काढला तीन किलोचा गोळा
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 24, 2011 AT 12:00 AM (IST)

नंदुरबार - येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या विविध रोग निदान शिबिरात आदिवासी महिलेच्या पोटातून तीन किलो वजनाचा गोळा काढण्यात आला. जिल्ह्यात शिबिरासारख्या उपक्रमात प्रथमच "ह्यूज फायब्राईट'ची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने विशेष समाधान व्यक्त होत आहे. मुंबई येथील कामा हॉस्पिटलच्या सहयोगी प्रा. डॉ. राजश्री कटके यांनी ही शस्त्रक्रिया केली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, डॉ. हीना गावित यांनी जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत सर्व रोग निदान, उपचार शिबिरांचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात नेत्र, दंत, स्त्रीरोग आदींचे निदान केले जात आहे. यात पोटदुखीने त्रस्त असलेली खर्डी (ता. तळोदा) येथील गुरबाबाई राकेश पाडवी ही शिबिरात दाखल झाली. तिने यापूर्वी अनेक डॉक्‍टरांना प्रकृती दाखवली होती. परंतु आर्थिक स्थितीअभावी ती पुरेसे उपचार करून घेऊ शकली नाही. या शिबिरात जे. जे. हॉस्पिटलच्या महिला विभाग प्रमुख डॉ. रेखा डावर यांनी तिची तपासणी केली. तिच्या पोटात मोठा गोळा असल्याचे निदान झाले. तिच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याचा सल्ला दिला.

गुरबाबाईला जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. तिच्यावर मुंबई येथील कामा हॉस्पिटलच्या सहयोगी प्रा. डॉ. राजश्री कटके, डॉ. सचिन नाईकनवरे यांनी नुकतीच शस्त्रक्रिया केली. पोटातून तीन किलोचा ट्यूमर काढण्यात आला. त्यास वैद्यकीय भाषेत "ह्यूज फायब्राईट' असे संबोधण्यात येते.
याबाबत डॉ. कटके यांनी "सकाळ'ला सांगितले, यापूर्वी आपण विविध ठिकाणी शस्त्रक्रिया करून रुग्णांच्या पोटातून पाच आणि आठ किलोचे गोळे काढले आहेत. मात्र या भागात येऊन केलेली शस्त्रक्रिया विशेष समाधान देणारी ठरली आहे. महिलांच्या आरोग्याकडे कुटुंबातून दुर्लक्ष केले जाते. त्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. महिलांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. शिबिराच्या माध्यमातून डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावित आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे.

या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत 50 हजारांहून अधिक खर्च येतो. येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आदिवासी महिलेला जीवदान मिळाल्याचा आनंद वाटतो